गरीब रुग्णांच्या उपचारासाठी मदत २०२४
1/6
1/7
#SaluteToTheCoronaWarriors
सामाजिक कार्याचे बाळकडू लहापणापासून घरातच मिळाले.आई सौ इंदुमती धुंदरे आणि वडील श्री पी. डी धूंदरे घरात येणाऱ्या प्रत्येकाला खावू घालणं,अडचणीला मदत करणे,एखाद्याचा संसार उभा करणे,सावरणे हे ते दोघे अगदी सहज ,जाता जाता पार पाडत तेही पूर्ण निःस्वार्थी.ना प्रसिध्दी ना राजकीय स्वार्थ.आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना तेव्हापासून दृढ झाली.
तेच गुण कमी अधिक प्रमाणात आम्हा सर्व भावंडांमध्ये आले...आपापल्या परीने लोकांना मदत चालू होती.डॉक्टर असल्याने प्रोफेशनल लाईफ मध्ये लोकांना मदत करण्याची संधी सोडली नाही.सुदैवाने पती डॉ.संदीप पण त्याच विचारांचे असल्याने त्या वृत्ती ला खतपाणी च मिळाले.
पण प्रोफेशनल लाईफ मध्ये बिझी असताना कधी कधी आपण गरज असेल तेव्हा त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नाही...किंवा एखादा गरजवंत आपल्यापर्यंत येवू शकत नाही.अश्यावेळी एका प्लॅटफॉर्म ची गरज होती.
नेमक्या याच वेळी साधारण २०१८ मध्ये समविचारी,समवयस्क मित्रमंडळी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आली आणि विचार चालू झाला.हळू हळू तो विचार दृढ झाला आणि चैतन्य स्पर्श चे बीज रोवले.
१५ लोक.... प्रत्येकाचे काम वेगळे,शिक्षण वेगळे,कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी...पण एकत्र आले एकाच विचाराने
आपल्यातील अर्धा घास भुकेल्याला द्यावा,मायेचा,आधाराचा स्पर्श गरजवंताला द्यावा. आज चैतन्य स्पर्श चे रोपटे अंकुरित झाले आहे.
आई अंबाबाई आम्हाला नेहमी योग्य मार्गाने मार्गदर्शन करेल.तिचा आशीर्वाद पाठीशी राहु दे....आणि तिच्या प्रेरणेने आमचे काम सदैव चालू राहु दे ही प्रार्थना
डॉ अर्चना संदीप पाटील
(MBBS .D.Ortho)
संस्थापक, चैतन्य स्पर्श फोंडेशन
Om Fracture & Joint Replacement Center, Kolhapur
एखाद्या चांगल्या संघटनेची सुरुवात व्हायची असेल तर कुठली ना कुठली गोष्ट घडावी लागते. आमच्या चैतन्य स्पर्श फौंडेशनची सुरुवातही अशीच एका गोष्टीतून झाली ती म्हणजे शाळेतील मित्रमैत्रिणींचे २२ वर्षांनी झालेलेले गेट टुगेदर. आम्ही सगळे महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर या शाळेचे सन १९९६ मध्ये दहावी पास झालो आणि प्रत्येक जण आपापल्या विश्वात पंख पसरू लागले. कधी कधी कोणाची गाठभेट व्हायची पण बरेच मित्र मैत्रीण विस्मरणात गेले होते. साधारणतः २०१८ मध्ये बर्याच मित्रमैत्रिणींच्या अथक प्रयत्नांनी आम्ही साधारण २०० जण एकत्र आलो आणि जंगी गेटूगेदर केल फारच धमाल केली. सर्व जण खुश होते त्याच दिवशी आम्ही अर्चना वर्षा आणि मी गप्पा मारत असताना एखादा सामाजिक उपक्रम सुरु करावा असा विचार मनात आला. बरेच दिवस विचार विनिमय करण्यातच गेला आणि मग ठरवले की एक पाऊल पुढे टाकावे.
मग हा विचार संदेश भोसले अभिजित भोसले यांना तसेच भूषण कुलकर्णी, रवि तावडे, रितेश पाटील, सोनल, अरविंद तवटे, नंदू इंगवले यांना सांगीतला. त्यांनाही हा विचार पटला व लगेच होकार ही दिला. मग काय हा विचार शाळेच्या whatsapp ग्रुप वर टाकला आणि एक मिटींग आयोजित केली. या मिटींगला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आमचे जिवाभावाचे आणखी मित्र या कार्यात सामील झाले. आम्ही एकंदरीत 15 जण या टीम मध्ये आहोत. प्रत्येक जणात काही ना काही क्वालिटीज आहेत ज्या चैतन्य स्पर्श फौंडेशनला घडवण्यात उपयोगी पडत आहेत. सुरुवात करायची झाली तर भूषण कुलकर्णी, रवी तावडे, रितेश पाटील हे त्रिकूट कधीही कोणत्याही जबाबदारीस एकदम तयार ; नुसते तयार नाही तर जबाबदारी उत्तम रित्या पेलतात. पुढचे आमचे मित्र अभिजित पाटील, नंदू इंगवले, अभिजित सरनाईक. त्यांचा चेहर्यावरील हास्य माझ्यामते हे हास्य नेहमीच आमच्या ग्रुपला Energy देण्याच काम करत. अरविंद तवटे आणि सोनल सावंत नुसती आमच्या ग्रुपची नाही तर अख्या कोल्हापूरातील बर्याच मित्रमैत्रिणींची इथंबूत माहिती असणारी. ही रत्ने खरतर अशे मित्र सर्व ग्रुप मध्ये असावेत. संदेश भोसले, अभिजित भोसले दोन्ही भोसले पण अतिशय मवाळ जबरदस्त करिअर असलेले पण तरीही Down the Earth. अमित पाटील आमचा C. A. हा सुद्धा आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून ऑनलाईन का असेना वेळ देणार तसेच बहुमुल्य सुचना ही करणार. आणि आमचा न्यू इन्टर संदीप साळोखे हा ही अत्यंत हसत खेळत आमच्यात कधी मिक्स झाला आम्हालाच कळले नाही. तर अशी ही आमची टीम गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात भाग घेऊन सामाजिक उपक्रम राबवत आहे.
मुद्दाम नमूद करावेसे वाटते या 2019 मध्ये झालेल्या महाभयंकर पुरामध्ये कोल्हापुरात सर्वात प्रथम मेडिकल कॅम्प करणारा आमचा ग्रुप होता. मग तो सर्व सामांन्यासाठी असो पोलिसांसाठी असो अथवा पुरामुळे महामार्गावर अडकलेल्या ट्रक वाल्यांसाठी. असो आज पर्यंत फौंडेशनने बरेच सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत आणि पुढेही घेत राहूच.
सर्वांना विनंती की आपण सर्वांनीही या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा.
श्री.ऋषिकेश रविदत्त गोडबोले (B.COM,M.COM,MBA)
संस्थापक, चैतन्य स्पर्श फोंडेशन
आदित्य फायनान्स अँड मार्केटिंग,शेअर मार्केट सल्लागार