मनातील सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा ठेवणाऱ्या काही लोकांनी एकत्र येऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 'स्पर्श फौंडेशन 'ची स्थापना केली.त्या अंतर्गत पहिला उपक्रम 'माऊली केअर सेन्टर',संभाजी नगर येथे बुधवार दिनांक 17 जुलै,2019 रोजी पार पडला.माऊली केअर सेन्टर मधील 40 ते 50 वृद्ध लोकांशी फौंडेशन सदस्यांनी थेट संवाद साधला.त्यांच्या सुख दुःखाच्या आठवणी ऐकल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत.कार्यक्रमांतर्गत वृद्धाश्रमासाठी बेडशीट सेट्स आणि रबर शिट्स भेट म्हणून देण्यात आल्या. कदम कुटुंबीयांनी माऊली अंतर्गत समाजात राखलेला सेवाभाव खरंच स्तुतीप्राय आहे.त्यांच्या गरजेला सोबत राहण्याची तयारी स्पर्श फौंडेशन ने दाखवली आहे
पुरामध्ये कित्येक संसार उदवस्थ झाले,पण आपण कोल्हापूरकर सामाजिक बांधिलकी जपत पूर्ण ताकतीने सर्वांच्या मदतीला हर एक प्रकारे धावलो,अन्नधान्य,कपडालत्ता,धान्य,सुटकेसाठी धडपड सर्वासाठी एकजुटीने धावलो,धीर दिलाएकमेकांना.आपणं सर्व हे करत असताना आणखी ही बरेच लोक त्यामागे राबत होते,दिवसरात्र जागे होते,ती म्हणजे पोलिसयंत्रणा....त्यांच्या कामाकडे त्यांचे कर्तव्यच आहे त्यात काय असे बोलून त्यांचे आभार मानणे कदाचित विसरून गेलो होतो म्हणूनच 3..4 दिवस पुरग्रस्तांना मदत केल्यानंतर आज स्पर्श फौंडेशनने या पोलिसांना मनाचा मुजरा द्यायचा ठरवला.त्या अंतर्गत आज कागल टोलनाका ते पंचगंगा पुल पर्यंत ड्युटी वर सज्ज पोलीस,आरटीओ ,अडकलेले ट्रक चालक आणि इतर यंत्रणेला मोफतऔषध वाटपकेले,कॅडबरी देऊन मनाने वोट ऑफ थँक्स देण्यात आले.त्त्यांच्याविषयी आदर दाखवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरआलेले समाधान …
हळदी गावात संपूर्ण घर पुरात उध्वस्त झालेल्या कुटुंबांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप आज स्पर्श फौंडेशन च्या वतीने करण्यात आले, झालेल्या नुकसानाची सम्पूर्ण भरपाई आपण करू शकत नाही पण थोडा हातभार नक्कीच लावू शकतो याचेही समाधान काही कमी न्हवते.आटोपशीर आणि वेगळेच समाधान देणारा हा उपक्रम या लोकांच्या चेहऱ्यावरही समाधान देऊन गेला, परत उभारण्याची जिद्द आणि आपल्या सोबत आपले लोक आहेत हा विश्वास देऊन गेला असावा हे नक्की.....
दिनांक डिसेंबर २०२० रोजी,चैतन्य स्पर्श फौंडेशन वतीने,शिवाजी विद्यालय गणेशवाडी येथे मोफत नेत्रातपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात 'मोबाईल अतिवापराचे दुसपरिणाम'या विषयावर फौंडेशन अध्यक्षा, डॉ वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले,डॉ. तमन्ना शेख यांनी नेत्रातपासनी केली, फौंडेशन सदस्य ऋषिकेश गोडबोले यांनी शाळा कार्यकरणीचे आभार मानले. सदर शिबिरात हजार हुन अधिक लोकांनी लाभ घेतलाच,तसेच गरजूंसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन उपलब्दतता करून देण्यात आली.शालेय संस्था संस्थापक नामदेव पाटील,आझाद हिंद क्रांती सेनाचे संस्थापक मुकुंद पाटील आणि चैतन्य स्पर्श फौंडेशन चे सर्व कार्यकारणी सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
सगळीकडे कडक लॉक डाउन ,फक्त आरोग्य सेवेतील लोकांना आणि जीवनाआवश्यक वस्तू सं बंधित लोकांना रस्त्यावर उतरण्याची मुभा. त्याव्यतिरिक्त दिसत होते ते जागोजागी जमावबंदी ,वाहतूक नियंत्रण ही कर्तव्य बजावणारे पोलीस यंत्रणा. कोरोना वातावरण नुकतच सुरू झाल्यामुळं मास्क, ग्लोव्हज ,सॅनिटीझर सर्व काही नवीन.अचानक आलेल्या ह्या जागतिक महा मारीमुळे आणि अचानक वाढलेल्या मागणीमुळे जागोजागी सर्वत्र ह्या गोष्टींचा तुटवडा जाणवत होता. अश्या परिस्थितीतही पोलीस वर्ग दिवस रात्र ,उन्हातान्हात आपलं कर्तव्य बजावत होते, दररोज टोल नाके चेक करताना बाहेरून येणाऱ्या लोकांच्या समपर्कात येत होते. ह्या खूप काळ चालणाऱ्या कोरोना विरोधातील लढाईत पोलीस यंत्रणा अखंड सक्षम राहणं खुप महत्वाचं.म्हणूनच चैतन्यस्पर्श फौंडेशन ने एक काम हाती घेतले. प्रत्येक सदस्यांच्या आपापल्या भागात जी पोलीस यंत्रणा राबतेय त्यांना मोफत फेस शिल्ड वाटप करण्याचे. याच बरोबर शहरातील मोठ्या चौकात उभ्या असणाऱ्या पोलीस वर्गापर्यंतही संरक्षक फेसशिल्ड पोहोचवण्याचे....
सध्या जगभरात कोरोना जसा धुमाकूळ घालत आहेत त्यातून आपणही सुटलेलो नाही.घोषित केलेल्या lockdownला उत्तम प्रतिसाद देऊन आपण अप्रत्यक्ष कोरोना विरोधी लढ्यात सहभागी आहोतच पण सध्या बरेचसे छोटे मोठे उद्योग बंद असल्याने अर्थ व्यवस्था ही बाधित झालीच होती,ह्या प्रसंगी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, औषधे, लहान सहान कामगार, मजूर, हातावरचे पोट असणारे मजूर वर्ग आणि त्यांची कुटुंबे, अन्न धान्य ची गरज आणि योग्य ठिकाणी त्याचा पुरवठा अशा अगणित गोष्टी देशापुढे आव्हान देऊन उभे आहेत. त्याला हातभार लावण्याचा मानस चैतन्य स्पर्श फौंडेशन चा आहे. तरी त्यासाठी इच्छित व्यक्तींच्या,सर्वांच्या सहकार्याने उभा राहिलेली काही मदत विश्वासपूर्वक दिनांक २१ एप्रिल,२०२० रोजी मुख्य मंत्री आणि प्रधान मंत्री फंडाला सुपूर्त करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे दरवर्षी माऊली केअर सेंटर ला आवर्जून मदत करण्याचा संकल्प पार पडला ४ जुलै २०२० रोजी. कोरोना काळात येणारे मदतीचे ओघ अचानक बंद झाल्याने घरगुती उपयोगी वस्तू आणि धान्याची कमतरता सेन्टर ला भासत होती, त्यामुळे ह्यावर्षी जेवणुपयोगी धान्य, कडधान्य, तेल अशा स्वरूपात साधारण ५०-६० लोकांना पुरेल अस साहित्य सुपूर्त करण्यात आलं
3इडियट ओरिजिनल फ्रेम,सोनम वंगचुक यांच्या अँटी चायनीज ऍक्टिव्हिटी ला चैतन्य स्पर्श फौंडेशन ने ही साथ द्यायची ठरवली आहे,त्याची सुरुवात ऑगस्ट 2020 पासून करण्यात आली असून प्रत्येक सदस्याने वैयक्तिक नि फौंडेशन पातळीवर चायनीज अँप विररुद्ध चळवळ करायचे ठरले,या संदर्भात व्हाट्स अँप माध्यमातून आपापल्या क्षेत्रातील व्यक्तींना चायनीज वस्तू, मोबाइल अँप वगळणे का नि कसे महत्वाचे आहे हे पटवून देण्यात आले.सदर उपक्रमालाही जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे
२८ नोव्हेंबर २०२० रोजी फौंडेशन वतीने फौंडेशन च्या दोन डॉ सदस्या ,डॉ. वर्षा पाटील आणि डॉ. अर्चना पाटील यांचा करोना योद्धा म्हणून सत्कार केला गेला. कॉविड काळात त्यांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.
पोटापाण्यासाठी माणूस गरज पडेल ते काम करतो, धड धाकट माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा जितकी करतो त्याहीपेक्षा अधिक कष्ट हे दिव्यांग, अपंग लोकांना करावे लागतात, त्यात ह्या वर्षी कित्येक छोट्या व्यावसायिकांना ह्या कोरोना ने आर्थिक फटका दिलाय. भवानी मंडप, शिवाजी पुतळा अश्या कित्येक ठिकाणी अनेक अपंग,दृष्टिहीन लोक 1,2 रुपयासाठी उन्हातान्हात नवीन वर्षांचे कॅलेंडर विकत उभारलेले असतात, त्यांना दरवर्षी एक हात मदतीचा द्यायचा निर्णय चैतन्य स्पर्श ने केलाय,त्याच्याकडील कॅलेंडर सर्व नातेवाईक नि आपल्या लोकांसाठी खरेदी करून, नि ह्याची सुरुवात केली डिसेंबर २०२० पासून
असं म्हणतात की जन्म कुठेही घ्यावा पण मरण कोल्हापूरातच यावं, कारण येथील अंत्यसंस्कार करताना होत असलेलं व्यवस्थित दहन, आपण आजही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी डिझेल, रॉकेल , टायर चा वापर अंत्यसंस्कार करताना करावा लागतो पण आपल्या कोल्हापुरात शेणी, लाकडांचा वापर करून व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यात येतात, या कोरोनाच्या कठीण काळात आपण मृतदेहाची बऱ्याच ठिकाणी विटंबना होत असताना आपल्या कोल्हापुरात अंत्यसंस्कार करताना शेणीची गरज लक्ष्यात घेऊन *शिवराज्याभिषेक दिनाचे* औचित्य साधूनमहाराष्ट्र हायस्कूल च्या 95 /96 च्या विद्यार्थ्यांच्या *चैतन्यस्पर्श फौंडेशन* च्या वतीने 5000 शेणी देऊन मदत करण्यात आली, यावेळी फौंडेशन चे अभिजित भोसले, नंदकिशोर इंगवले, अभिजित सरनाईक, संदीप साळोखे, सोनल सावंत, अरविंद तवटे, अभिजित पाटील हे उपस्थित होते
यूट्यूब लिंक - https://youtu.be/8MyxTF2ulQY
डॉ. निलेश घाडगे ह्यांच्या ऐच्छिक देणगीतून चैतन्य स्पर्श फौंडेशनच्या वतीने मळगे गावातील साधारण ४७ पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली
आज २३ जुलै २०२२ रोजी सानेगुरुजी, राजोपाध्येनगर येथील अंध मुलामुलींच्या वसतिगृहा साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू चैतन्य स्पर्श फाऊंडेशन वतीने सहकार्य म्हणुन देण्यात आल्या .या वेली वसतिगृहाचे अध्यक्ष संजय धेंगे यांची त्यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास थोडक्या शब्दात तर मांडलाच पन वसतिगृहातील मुलीनी छान गाणे सादर केले व भ्रूणहत्या विरोध ही दर्शवला त्यातून. रत्नागिरी,हिंगोली, अकोला, परभणी कुठून कुठून ही पौगंडावस्थेतील मूल, मुली आपल्या घरापासून दूर स्वतः च्या पायावर उभे राहण्याच्या,अडचणींवर मात करत शिकण्याच्या जिद्दीने कोल्हापुरात येऊन धडपडतात खरच विचार करायला लावणार आहे. याही पुढे ज्या ज्या स्वरुपात मदत करता येण शक्य आहे ती करण्याची इच्छा फाऊंडेशन कडून व्यक्त करण्यात आली. सदर ऍक्टिव्हिटी साठी फाऊंडेशन मेंबर्स ऋषिकेश गोडबोले, भूषण कुलकर्णी, रवी तावडे, अभिजित पाटील, अभिजित सरनाईक, नंदकुमार इंगवले, डॉ. अर्चना पाटील आणि अध्यक्षा डॉ. वर्षा पाटील उपस्थित होते.
आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी चैतन्य स्पर्श फाउंडेशन वतीने कुडीत्रे साखर कारखाना येथे आलेल्या ऊस तोडणी कामगारांसाठी मोफत चादरी वाटप करण्यात आले.... तसेच आरोग्य विषयक तक्रारीसाठी मोफत औषधोपचार मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमासाठी डॉ.वर्षा पाटील, ऋषिकेश गोडबोले, रवी तावडे, भूषण कुलकर्णी आणि संदेश भोसले उपस्थित होते.
तर इतर सदस्य डॉ. अर्चना पाटील, अभिजित भोसले, रितेश पाटील, अभिजित पाटील, नंदकिशोर इंगवले, अमित पाटील, अभिजित सरनाईक, संदीप साळोखे, अरविंद तवटे आणि सोनल सावंत यांचे बहुमूल्य योगदान लाभले .
सदर भेटीमध्ये ऊस तोडणी कामगारांना येणाऱ्या दैनदिन समस्या ,आरोग्य विषयक समस्या, स्रीया, लहान मुलांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्या निरसन करण्याच्या दृष्टीने फाउंडेशन तर्फे योग्य पाऊल उचलले जाईल अशी ग्वाही देण्यात आली.
सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी फारच अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या उत्तम निकालाने नावारूपाला येत असलेल्या
मनपा. राजे छत्रपती संभाजी विद्यालय क्र. ६६ या शाळेत नविन वर्ग उभारणीसाठी
"चैतन्य - स्पर्श फाऊंडेशन , कोल्हापूर" कडून शाळेला फ्लॅश वीटा व केमिकल बॅग्ज अशी वस्तुरुपाने मदत करण्यात आली .
महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक भान जपण्यासाठी तयार केलेल हे चैतन्य - स्पर्श फाऊंडेशन आहे . यामध्ये डॉक्टर , अभियंता , व्यावसायिक असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक कार्यरत आहेत .
सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दरवर्षी या फाऊंडेशन तर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
सदर उपक्रमासाठी या ग्रुपचे संस्थापक श्री ऋषिकेश गोडबोले, सध्या कार्यकारणी अध्यक्ष संदीप साळोखे, उपाध्यक्ष भुषण कुलकर्णी, सचिव रवी तावडे,इतर सदस्य डॉ.वर्षा पाटील,अरविंद तवटे,सोनल सावंत, डॉ. अर्चना पाटील,अभिजित पाटील, अभिजीत सरनाईक, नंदकिशोर इंगवले, रितेश पाटील आणि अमित पाटील यांचे सहकार्य लाभले.
50,000 rs donation given by the Chaitanya Sparsh Foundation for the Kidney transplant procedure of Miss Deepali Pramod Daddhanhamaannavar.
दि. १५/०१/२०२४ रोजी ठरल्या प्रमाणे आपल्या फाऊंडेशन तर्फे अंध युवक मंच हणबरवाडी संचलित अंध मुला - मुलींचे निवासी वसतिगृह येथे प्रापंचिक साहित्य प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार.
जय हनुमान हायस्कूल व बा. वी.वडेर ज्युनि.कॉलेज इस्पुर्ली.भाग शाळा -नंदगाव ता. करवीर जि.कोल्हापूर. या शाळेचे नूतन वास्तूचे बांधकाम सुरू आहे त्यासाठी चैतन्य स्पर्श फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने शंभर पोती सिमेंट ची मदत दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली यावेळी फौंडेशनच्या वतीने संदीप साळोखे ,नंदकिशोर इंगवले, सोनल सावंत आणि भूषण कुलकर्णी उपस्थित होते.
सौ. सीताबाई नारायण सुतार यांच्या पायावर पाटा पडल्याने दुखापत झाली आहे तरी त्यांना औषधोपचार साठी फौंडेशन कडून आज २३ मार्च २०२४ रोजी मदत करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अरविंद तवटे,सचिव सोनल सावंत,ऋषिकेश गोडबोले,अभिजीत पाटील, अभिजित सरनाईक,रविंद्र तावडे,आणि भूषण कुलकर्णी हे सदस्य सहभागी होते.
वृंदा जोग कॅन्सर पेशंट यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी फौंडेशन कडून आज २३ मार्च २०२४ रोजी त्यांना मदत करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे, सचिव सोनल सावंत,अभिजीत पाटील, ऋषिकेश गोडबोले, आणि अभिजित सरनाईक हे सदस्य सहभागी होते.
श्री. रविंद्र सदाशिव गायकवाड डायलेसिस पेशंट यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी फौंडेशन कडून त्यांना आज २३ मार्च २०२४ रोजी मदत करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अरविंद तवटे,सचिव सोनल सावंत,ऋषिकेश गोडबोले,अभिजीत पाटील, अभिजित सरनाईक,रविंद्र तावडे,आणि भूषण कुलकर्णी हे सदस्य सहभागी होते.